पुणे : बेदरकारपणामुळे मोटारचालक महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर घडली. भरधाव मोटार डोंगर कपारीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मोटाराचा चुराडा झाला. भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुचीम मोहित कपूर (वय २२, रा. उंड्री, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालक तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी युवराज दुधाळ यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचीम एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी (२२ फेब्रुवारी) मोटारचालक रुचीम कात्रज बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. मंतरवाडी भागात मोटारचालक रुचीमचे नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या कपारीवर आदळली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत. कात्रज बाह्यवळण मार्गावर उंड्री परिसरात महिनाभरापूर्वी टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार डाॅक्टर महिलेचा मृत्यू झाला होता.

वाघोलीत मोटारीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राधिका कृष्णा साेनवणे (वय ५२) असे मृत्युूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अजय ज्ञानेश्वर धोत्रे (वय २०, रा. सुयोगनगर, वाघोली, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत सोनवणे यांचे जावई शरद भाकरे (रा. भवानी पेठ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राधिका सोनवणे वाघोली परिसरातून शनिवारी निघाल्या हाेत्याा. केसनंद फाटा चौकात भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वाघोली भागात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात सहप्रवासी तरुण जखमी झाला. राहुल तुकाराम चौरे (वय २८, रा. जुनी सांगवी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी दुर्गेश गवळी (वय २८, रा. मगरपट्टा, हडपसर) गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार राहुल आणि त्याचा मित्र दुर्गेश शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून निघाले होते. सातव क्रेन सर्व्हिससमोर भरधाव टँकरने दुचाकीस्वार राहुल आणि दुर्गेश यांना धडक दिली. अपघातात राहुल आणि दुर्गेश गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या राहुल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.