पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासना कडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती देखील नेमण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनांमार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.तर आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत यावेळी चिल्लर फेकून निषेध नोंदविला.
पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. लहुजी सेनेच्या दोन… pic.twitter.com/z81pEQgU0Y
— LoksattaLive (@LoksattaLive) April 5, 2025
तसेच काल पतितपावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासून निषेध नोंदविला होता. त्यामुळे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकला.तर त्याच दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहुजी सेनेचे दोन कार्यकर्ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवर जाऊन कार्यकर्त्यच अर्धनग्न आंदोलन सुरू आहे.रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.