पुणे : दिल्ली यथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी रेल्वे गाडी धावणार आहे, अशी माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली.
यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद राजधानी दिल्लीकरांकडे आहे. त्यामुळे विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती. दरम्यान, याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी विनंती रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार बुधवारी (१९ फेब्रुवारी) पुणे ते दिल्ली सफदरजंग ही रेल्वे दुपारी ३ वाजून १५ मिनीटांनी सुटेल. तर रविवारी (२३ फेब्रुवारी) दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री १०.३० वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
या गाडीला जळगाव आणि ग्वालियर असे दोनच थांबे असणार आहेत, तर १६ शयनकक्ष आणि दोन द्वियीय श्रेणी, असे डब्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.