पुणे : कोंढव्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन महिलांसह सात येमेन देशातील नागरिकांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात शिक्षण, व्यवसाय, तसेच उपचारांसाठी मोठ्या संख्येने परदेशातील नागरिक वास्तव्यास येतात. काही परदेशी नागरिक व्हिस्साची मुदत संपल्यानंतर बेकायदा वास्तव्य करतात. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले. त्यानंतर परकीय नागरिक नोंदणी विभागाने परकीय नागरिकांची तपासणी सुरू केली. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील एका सोसायटीत वास्तव्यास असलेल्या दोन महिलांसह सात येमेनी नागरिकांची व्हिस्साची मुदत संपल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस (लिव्ह इंडिया नोटीस) बजाविली असून, त्यांची लवकरच हक्कालपट्टी केली जाणार आहे, अशी माहिती परकीय नागरिक नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.