पुण्यात देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला लागलेली भीषण आग विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून आता येथे कुलिंग ऑपरेशनचे काम सुरु आहे. गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास या दुकानात भीषण आग भडकली होती.

या अग्निदुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एकूण पाच कामगार होते. धुरामध्ये गुदमरुन व भाजल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला.

या आगीमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली आहे. हे संपूर्ण साडी सेंटर जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांपैकी चार जण परराज्यातील होते. देवाची ऊरळी येथे अनेक साडयांची दुकाने आहेत. पहाटेच्या सुमारास राजयोग साडी सेंटर दुकानात आग भडकली. आग नेमकी कशामुळे लागली ते अजून समजलेले नाही.

मृतांची नावे
राकेश चौधरी (२४)
राकेश मेघवाल (२०)
धर्माराम बडियासर (२४)
सूरज शर्मा (२५)
गोपाल चांडक (२३)