पुणे : मधूर सुरांचे वादन करणारे बँडपथकातील वादक कलाकार, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्ते, आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान गणरायाची मूर्ती आणि ढोल-ताशांचा निनाद अशा उत्साही वातावरणात मंगळवारी (१९ सप्टेंबर) लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आणि नागरिक सज्ज झाले आहेत.  भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच मंगळवारच्या अंगारक योगावर आलेल्या गणेश चतुर्थीला मानाच्या गणपतींची मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरोघरी गणपतीची मूर्ती खरेदी करण्याबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे देखावे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. यंदा श्रावण महिना अधिक आल्यामुळे गणरायाचे आगमन महिनाभराच्या उशिराने होत असले तरी आता प्रतीक्षा संपुष्टात येत असून घरातील आबालवृद्धांसह मंडळांचे कार्यकर्ते गणपतीच्या प्रतिष्ठापनेची तयारी करण्यामध्ये व्यग्र झाले आहेत. या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणे भरली नसली तरी हे विघ्न गणरायच दूर करतील ही श्रद्धा बाळगून सारे गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक झाले आहेत. मानाच्या गणपतींची मंगळवारी माध्यान्हीपूर्वी प्रतिष्ठापना होणार आहे.

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय

हेही वाचा >>> गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांची झाडाझडती

श्री कसबा गणपती

पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मंगळवारी डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी  होणार आहे. तत्पूवी सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. फडके हौद, देवाजी बाबा चौक, दारूवाला पूल, रास्ते वाडा, जिवा महाले चौक (अपोलो चित्रपटगृह) मार्गे रास्ता पेठ येथे मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्याकडून घेतलेली गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल. प्रभात बँडपथक, संघर्ष ढोल-ताशा पथक, श्रीराम ढोल-ताशा पथक आणि शौर्य ढोल-ताशा पथक यांचा सहभाग असलेली मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

पुण्याची ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणुकीला सुरूवात होणार असून केळकर रस्त्यावरील मूर्तीकार गुळुंजकर यांच्याकडून गणेश मूर्ती घेण्यात येईल. आढाव बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, न्यू गंधर्व ब्रास बँडपथक, विष्णूनाद शंखपथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. हगवणे चाळ, लोखंडे तालीम, कुटे चौक, लिंबराज महाराज चौक, गणपती चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आल्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे: गणेशोत्सवामुळे फळे, फुलांना मागणी वाढली; दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ

गुरुजी तालीम मंडळ

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे.  तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक उत्सव मंडपातून मिरवणूक सुरू होईल. सुभाष आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथामध्ये मूषकावर स्वार गणरायाची मूर्ती विराजमान असेल. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे जोगेश्वरी मंदिर, बुधवार चौक आणि बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल. जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा, गंधर्व ब्रास बॅंड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, शिवप्रताप ढोल- ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा-पथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.

तुळशीबाग गणपती

श्री तुळशीबाग गणपती उत्सव मंडळातर्फे यंदा उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (१८ सप्टेंबर) रात्री आठ वाजता गणेश मूर्ती उत्सव मंडपात आणली जाणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट चे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते नीलेश गायकवाड, ललित जैन, मनोज छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मूर्तीचे स्वागत केले जाईल. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरा पासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून मंगळवारी सकाळी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत नगारावादानचा गाडा, एक बॅंडपथक आणि एक ढोल ताशा पथक असेल. तुळशीबाग राममंदिर येथून हुतात्मा बाबू गेनू चौक, मंडई, शनिपार रस्ता, बाजीराव रस्त्याने लिंबराज महाराज चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून उत्सव मंडपात येईल. दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

हेही वाचा >>> ‘दगडूशेठ गणपती’ची प्रतिष्ठापना सरसंघचालकांच्या हस्ते; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही येणार

केसरीवाडा गणेशोत्सव

केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार १७ ऑगस्ट रोजी झाली आहे. त्यामुळे मंगळवारी गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापनेची स्वतंत्रपणे मिरवणूक निघणार नाही. मात्र, दाते पंचागानुसार पुन्हा गणेशोत्सव साजरा केला जाणार असून दररोज सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दाते पंचागानुसार केसरीवाडा गणपतीचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे.    

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना सकाळी साडेअकरा वाजता प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तत्पूर्वी उत्सव मंडपापासून सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक सुरू होणार आहे. आढाव बंधू यांचा नगावावादनाचा गाडा, शिवाजीराजे मर्दानी खेळ, शंखनाद पथक, श्रीराम, कलावंत, शिवरूद्र, अभेद्य आणि गजर ही पाच ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. शिवाजी रस्त्याने बेलवाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गुरुजी तालीम चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात येणार आहे.

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना ॲड. पराग एरंडे आणि अनुराधा एरंडे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता उत्सव मंडपातून सुरू होणारी मिरवणूक तात्या थोरात समाज मंदिर, मंडई पोलीस चौकी, हुतात्मा बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक मार्गे उत्सव मंडपात येईल. या मिरवणुकीत समर्थ ढोल-ताशा पथक, आवर्तन ढोल-ताशा पथक आणि न्यू गंधर्व बँडपथक सहभागी होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी होणार आहे. प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून आकर्षक फुलांनी सजविलेल्या हनुमान रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा, हुतात्मा बाबू गेनू चौक मार्गे मिरवणीूक उत्सव मंडपात येईल. देवळणकर बंधूंचा चौघडावादनाचा गाडा, गायकवाड बंधूंचा सनईवादनाचा गाडा, दरबार, प्रभात आणि मयूर ही बँडपथके, गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर भाविकांना गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. ट्रस्टने साकारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीवरील विद्युत रोषणाईचे उदघाटन सायंकाळी सात वाजता होणार आहे.

Story img Loader