पुण्यातील धायरी येथील श्री सराफ दुकानात भरदिवसा तिघांनी दरोडा टाकला असून तब्बल २५ ते ३० तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील रायकर मळा जवळील काळुबाई चौक येथील श्री सराफ ज्वेलर्स चे मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि त्यांचे कामगार दुकानात होते.त्यावेळी एक व्यक्ती दुकानात आला आणि सोन्याची चैन दाखवा, असे सांगितले.
त्यावर मालक विष्णू सखाराम दहिवाल हे सोन्याची चैन दाखवत असताना अचानक दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात आले.त्या दोघांनी हातामध्ये पिस्तुल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करण्यास सुरुवात केली.समोरील बाजूस असलेले २५ ते ३० तोळे सोने हिसकावून घेतले.
त्यावेळी दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता,तिघांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.तर त्यातील एकाने पिस्टलचे बट ने मारहाण करून दुचाकीवरून तिघे आरोपी फरार झाले आहेत.तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दोघांनी हातामध्ये पिस्तुल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करण्यास सुरुवात केली.समोरील बाजूस असलेले 25 ते 30 तोळे सोने हिसकावून घेतले.त्यावेळी दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता,तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.तर त्यातील एका आरोपीने मालकाच्या डोक्यात पिस्तुल जोरात मारले.त्यावेळी पिस्तुलाचा काही भाग तुटून पडला आणि त्यानंतर दुचाकीवरून तिघे आरोपी सोने घेऊन फरार झाले आहेत.तर ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली आहेत.पण ज्यावेळी ज्वेलर्स च्या दुकानाची पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी पिस्तुलाचा काही भाग हातामध्ये घेऊन पहिल्यावर ती पिस्तूल खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाल्याच सांगण्यात आले.