पुणे : देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. पण आज राज्यभरात प्रहार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी ज्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात आहे, त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या बाहेर दिव्यांग बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवार यांचा ताफा जात होता त्यावेळी दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली.

हेही वाचा – पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी, बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील घटना

हेही वाचा – काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर

दिव्यांगांच्या ‘या’ मागण्या

दिव्यांगाना प्रति महिना ६ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, व्यवसायासाठी कर्ज देण्यात यावे आणि व्यवसायासाठी २०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी, घरकुलासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दिव्यांगाना राजकीय आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

Story img Loader