पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार पुणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदारांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या प्रारूप मतदार यादीनुसार एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रावर ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार असून त्यामध्ये ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. तर जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात ५ लाख ९० हजार ६११ मतदार आहेत.त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारांची संख्या असलेला हडपसर विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.
या यादीनुसार जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्र असून १ लाख ६१ हजार ८९ पुरुष, महिला १ लाख ५३ हजार ७४४ तसेच तृतीयपंथीय ६ असे एकूण ३ लाख १४ हजार ८३९ मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५५ हजार ५५८, महिला १ लाख ४८ हजार ७०० आणि तृतीयपंथीय ८ असे एकूण ३ लाख ४ हजार २६६ मतदार आहेत.
हेही वाचा…पिंपरी: अखेर महापालिकेकडून खड्डे बुजविण्याच्या कामाला गती
खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८५ हजार ३५९, महिला १ लाख ७१ हजार ७३४ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ५७ हजार १०५ मतदार आहेत. शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३२ हजार ६३३, महिला २ लाख १२ हजार ६४६ आणि तृतीयपंथीय २१ असे एकूण ४ लाख ४५ हजार ३०० मतदार आहेत.
दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १ लाख ५८ हजार ८४०, महिला १ लाख ४८ हजार १९२ आणि तृतीयपंथीय १० असे एकूण ३ लाख ७ हजार ४२ मतदार, इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ६८ हजार ३६४ पुरुष, १ लाख ५७ हजार १६४ महिला आणि तृतीयपंथीय १२ असे ३ लाख २५ हजार ५४० मतदार आहेत.
बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ७०१, महिला १ लाख ८१ हजार ८५६ आणि तृतीयपंथीय २० असे ३ लाख ७१ हजार ५७७ मतदार आहेत. पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख २८ हजार ५७०, महिला २ लाख ७ हजार ८१३ आणि तृतीयपंथीय ३१ असे ४ लाख ३६ हजार ४१४ मतदार आहेत.
हेही वाचा…वारजे भागातून सायकल चोरणारे गजाआड, चोरट्यांकडून ३० सायकली जप्त
भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख १९हजार ३३१, महिला १लाख ९३ हजार ७९ आणि तृतीयपंथीय ४ असे ४ लाख १२ हजार ४१४ मतदार आहेत. मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १लाख ९३ हजार ३७, महिला १ लाख ८२ हजार ७२० आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७५ हजार ७७० मतदार आहेत.
चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३२ हजार ५९२ पुरुष, २ लाख ९४ हजार ७९७ महिला आणि तृतीयपंथीय ४८ असे ६ लाख २७ हजार ४३७ मतदार आहेत. पिंपरी मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ९८ हजार २३८, महिला १ लाख ७८ हजार ९८३ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ७७ हजार २५१ मतदार आहेत.
भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख ५ हजार ८५५, महिला २ लाख ५३ हजार ९ आणि तृतीयपंथीय ९५ असे ५ लाख ५८ हजार ९५९ मतदार आहेत. वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २लाख ४७ हजार ६३८, महिला २ लाख २८ हजार ८०० आणि तृतीयपंथीय १०० असे एकूण ४ लाख ७६ हजार ५३८ मतदार आहेत.
हेही वाचा…पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजुरीसाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना पकडले
शिवाजीनगर- २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४३ हजार ६, महिला १ लाख ३८ हजार ७८३ आणि तृतीयपंथीय ४२ असे २ लाख ८१ हजार ८३१ मतदार, कोथरूड- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २० हजार ४०३, महिला २ लाख ६५५ आणि तृतीयपंथीय २१ असे ४ लाख २१ हजार ७९ मतदार आहेत.
खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९० हजार ३४४, महिला २ लाख ५५ हजार ५१० आणि तृतीयपंथीय ३९ असे ५ लाख ४५ हजार ८९३ मतदार, पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ७६ हजार ४०५, महिला १ लाख ६८ हजार २४२ आणि तृतीयपंथीय ९२ असे एकूण ३ लाख ४४ हजार ७३९ मतदार आहेत.
हेही वाचा…शहरबात : सावध ऐका, पुढच्या हाका! हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीनंतर आता कोण…
हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १२ हजार ३७७, महिला २ लाख ७८ हजार १६३ आणि तृतीयपंथीय ७१ असे ५ लाख ९० हजार ६११ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४५ हजार ९७६ पुरुष, १ लाख ४० हजार ५०७ महिला आणि ३५ तृतीयपंथीय असे २ लाख ८६ हजार ५१८ मतदार आहेत. कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार २८, महिला १ लाख ४० हजार ५४३ आणि तृतीयपंथीय ३५ असे २ लाख ७८ हजार ६०६ मतदार आहेत.