पुणे : विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण मतदारसंघांत महायुतीची ‘लाडकी बहीण’ आणि महाविकास आघाडीची ‘महालक्ष्मी’ या योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिल्याने मतटक्का वाढल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा ५ लाख ६९ हजार ८३७ इतक्या अधिक महिलांनी मतदान केले आहे. त्यांची टक्केवारी ६०.८६ इतकी आहे. हा मतटक्का कोणाचा, याचे चित्र दोन दिवसांतच समजेल.

पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि उर्वरित ग्रामीण-निमशहरी भागातील दहा, अशा २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत मिळून ६१.०५ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतटक्क्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांत सरासरी ६९ टक्के, तर शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या विधानसभा (२०१९) निवडणुकीपेक्षा शहरात सहा टक्के मतदान वाढले आहे.

Khadakwasla constituency, MNS, votes,
‘खडकवासल्या’चा निकाल मनसेच्या हाती
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kothrud Constituency, Chandrakant Patil,
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्याची चर्चा
Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

हेही वाचा – दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक? राज्य मंडळाने दिले स्पष्टीकरण…

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही योजना राबविण्यात येत असल्याची टीकाही महायुती सरकारवर झाली. मात्र, अल्पावधीतच योजना लोकप्रिय ठरल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारात ही योजना केंद्रस्थानी राहिली. जिल्ह्यातील एकूण महिला मतदारांपैकी २० लाख ४८ हजार २९५ महिला मतदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निवडणुकीपूर्वी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा निधी जमा झाला आणि सत्तेवर आल्यास योजनेचा हप्ता १ हजार ५०० वरून २ हजार १०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले. तर, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा तीन हजार रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे, ‘लाडकी बहीण’ योजना लागू करणाऱ्या महायुतीच्या पारड्यात ही वाढलेली मते जाणार की, ‘महालक्ष्मी’ योजनेचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – ‘खडकवासल्या’चा निकाल मनसेच्या हाती

गेल्या निवडणुकीपेक्षा महिलांचे मतदान अधिक

गेल्या विधासभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात ७७ लाख २९ हजार २१७ मतदारांपैकी ३६ लाख ८६ हजार ८९२ महिला मतदार होत्या. त्यापैकी २० लाख २८ हजार ४४५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. या निवडणुकीत मात्र चित्र बदलल्याचे दिसून आले. या निवडणुकीत ग्रामीण भागातील एकूण महिला मतदारांपैकी बहुतांश महिला मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मतटक्का वाढण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरल्याचे दिसून येत आहे.