आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करणे आणि वाटप करण्यात पुणे जिल्हा पिछाडीवर आहे. योजनेतील पाच लाख ५७ हजार ८१ लाभार्थ्यांपैकी केवळ एक लाख ५५ हजार ६८२ जणांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ २७.९५ टक्के एवढे आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा- पुणे : महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर, कराडजवळ वाहतूक कोंडी

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारकडून गरजू कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत योजना देशभरात चालवली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे कार्ड तयार करण्याचे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता गावपातळीवर योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना एकत्रित करून आवश्यक कागदपत्रे (आधार, शिधापत्रिका, मोबाइल क्रमांक) घेऊन शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांतर्गत पुढील सात दिवसांत १०० टक्के लाभार्थ्यांना कार्ड वाटप करावे आणि अहवाल सादर करावा, असेही आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

हेही वाचा- एमपीएससीच्या चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

योजनेचा आढावा

तालुका- लाभार्थी कुटुंबे – लाभार्थी संख्या- कार्ड वाटप- टक्के

मावळ ७२०१             २१,७८५         ९६८८      ४४.४७
दौंड १६,३४६            ४९,७९८       १९,०९७ ३८.३५
पुरंदर ७५५७             २१,७५०         ७४०९         ३४.०६
बारामती २२,४९५           ६७,७८३       २१,२०८ ३१.२९
वेल्हे २७१६             ६६६९          १९८६        २९.७८
शिरूर ११,१९३             ३५,०७९        १०,०३२ २८.४९
भोर ६९१२             १९,१२३          ५४४९         २८.४९
आंबेगाव १५,४१३             ५०,६६६       १४,२९७ २८.२२
हवेली २०,६४७             ६९,३६८      १८,५९० २६.८०
मुळशी ३७१४             ८१९१          २१८९         २६.७२
जुन्नर २४,९२३             ८६,६९८       २२,००२ २५.३८
खेड १५,८५१             ४०,८१०        ८२४६         २०.२१
इंदापूर २४,४२७             ७९,३६१      १५,४८९        १९.५२
एकूण १,७९,३९५             ५,५७,०८१   १,५५,६८२ २७.९५