आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड तयार करणे आणि वाटप करण्यात पुणे जिल्हा पिछाडीवर आहे. योजनेतील पाच लाख ५७ हजार ८१ लाभार्थ्यांपैकी केवळ एक लाख ५५ हजार ६८२ जणांना कार्ड वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ २७.९५ टक्के एवढे आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा- पुणे : महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर, कराडजवळ वाहतूक कोंडी
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारकडून गरजू कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत योजना देशभरात चालवली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे कार्ड तयार करण्याचे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता गावपातळीवर योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना एकत्रित करून आवश्यक कागदपत्रे (आधार, शिधापत्रिका, मोबाइल क्रमांक) घेऊन शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांतर्गत पुढील सात दिवसांत १०० टक्के लाभार्थ्यांना कार्ड वाटप करावे आणि अहवाल सादर करावा, असेही आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
हेही वाचा- एमपीएससीच्या चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
योजनेचा आढावा
तालुका- लाभार्थी कुटुंबे – लाभार्थी संख्या- कार्ड वाटप- टक्के
मावळ ७२०१ २१,७८५ ९६८८ ४४.४७
दौंड १६,३४६ ४९,७९८ १९,०९७ ३८.३५
पुरंदर ७५५७ २१,७५० ७४०९ ३४.०६
बारामती २२,४९५ ६७,७८३ २१,२०८ ३१.२९
वेल्हे २७१६ ६६६९ १९८६ २९.७८
शिरूर ११,१९३ ३५,०७९ १०,०३२ २८.४९
भोर ६९१२ १९,१२३ ५४४९ २८.४९
आंबेगाव १५,४१३ ५०,६६६ १४,२९७ २८.२२
हवेली २०,६४७ ६९,३६८ १८,५९० २६.८०
मुळशी ३७१४ ८१९१ २१८९ २६.७२
जुन्नर २४,९२३ ८६,६९८ २२,००२ २५.३८
खेड १५,८५१ ४०,८१० ८२४६ २०.२१
इंदापूर २४,४२७ ७९,३६१ १५,४८९ १९.५२
एकूण १,७९,३९५ ५,५७,०८१ १,५५,६८२ २७.९५