पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालून महिला शिपायास शिवीगाळ करणऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळून लावला. ऋतिक लांडगे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलिस शिपायाने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी लांडगे याने वकिलांमार्फत शिवाजीनगर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पहाडे यांच्या न्यायालयात अर्ज केला. जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर अश्लील आणि असभ्य वर्तन केले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी कठडे (बॅरीकेट) ओलांडुन व्यासपीठाच्या दिशेने लांडगे निघाला होता. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यााला रोखण्याचा प्रयत्न केला. अतिमहत्वाच्या व्यक्तीजवळ पोहोचुन त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याचा आरोपीचा उद्देश होता किंवाकसे याबाबत तपास करायचा असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची विनंती अॅड. बोंबटकर यांनी युक्तिवादात केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालायने लांडगे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा