पुणे : पुणे जिल्हा किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत दरवर्षी नवनवे विक्रम स्थापित केला आहे. सन २०२३-२४ मध्ये आतापर्यंत ५७६३ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये एकूण ५०२० कोटी रुपये आणि त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये ३८९३ कोटी पीक कर्ज वाटप पुणे जिल्ह्यात झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर हाजीर हो…कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले समन्स

यंदा ५५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. यामध्ये मत्स्य व्यवसायासाठी दोन कोटी दोन लाख रुपये, पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कृषी मुदत कर्ज वाटपामध्येही ६००६ कोटी हजार रुपये कर्ज वाटप झाले असून पीक कर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ११ हजार ७६९ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. फेब्रुवारी आणि मार्चची आकडेवारी समोर आल्यावर यात आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी २०१५-१६ साली ३ हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा विक्रम थेट २०२१-२२ मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग तीन वर्षे नवीन विक्रम होत आहेत. गेली तीन वर्षे वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले लक्ष्य पार करून जिल्ह्यात कर्जवाटप करण्यात आले. सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात ८३ हजार २९७ कोटींचे उद्दिष्ट असताना दोन लाख पाच हजार २५९ कोटी आणि सन २०२२-२३ मध्ये एक लाख १७ हजार ७१६ कोटींचे उद्दिष्ट असतांना दोन लाख ७० हजार ९२५ कोटींचे कर्जवाटप झाले. त्या तुलनेत यंदा दोन लाख २३ हजार कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले. गेल्या तीन वर्षात जिल्ह्याचा कर्ज वाटप आराखडादेखील ८३ हजार कोटी वरून २ लाख २७ हजार कोटीपर्यंत वाढवण्यात आला असून हादेखील एक विक्रम आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune district set record in crop loan disbursement pune print news psg 17 zws