रेल्वेच्या पुणे विभागाने फेरीवाले आणि अनधिकृत विक्रेत्यांवर थेट कारवाई मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये पाण्याच्या बाटल्यांसह खाद्यपदार्थांची जास्त किमतीने विक्री होत असल्याने ही कारवाई सुरू आहे. १ एप्रिल ते १४ मे या कालावधीत ७४ अवैध विक्रेत्यांना कारवाईचा दंडुका बसला आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक अनधिकृत विक्रेते, फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. ते खाद्यपदार्थांवरील छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळतात. पाण्याच्या बाटलीची विक्रीही जादा दराने केली जाते. तसेच अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्रीही केली जाते. याबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी करून विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार रेल्वेने अनधिकृत विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई केली.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
thane traffic police
ठाणे: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

हेही वाचा >>> पुणे: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या स्वप्नांना बळ! ‘श्रम विद्या’ शैक्षणिक कर्ज योजना 

या मोहिमेदरम्यान ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या हवाली करण्यात आले. अनधिकृत पाण्याच्या २ हजार ७४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्व अनधिकृत विक्रेते पुणे स्थानकावर विनापरवाना खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची विक्री करीत होते. रेल्वे न्यायालयाने या विक्रेत्यांना ४९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी, अन्नपदार्थ निरीक्षक कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.

रेल्वे स्थानकाच्या आवारात अनधिकृत विक्रेत्यांचे प्रमाण वाढले होते. वाणिज्य विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याने हे प्रमाण आता कमी झाले आहे. – डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक