पुणे : जुन्या निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पुणे विभागाच्या वतीने मंगळवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. यामुळे पुणे विभागातील पुणे मुख्य कार्यालयासह पिंपरी, बारामती, सोलापूर, अकलूज या आरटीओ कार्यालयांतील काम संपामुळे बंद राहिले.

हेही वाचा – पुणे : जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ओस पडली, संपाचा परिणाम

हेही वाचा – बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही

पुणे मुख्य कार्यालयाच्या बाहेर कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद करून गांधी टोपी परिधान करून आंदोलन करण्यात आले. यावेळी द्वारसभा घेण्यात आली. या आंदोलनात सुमारे ८० कर्मचारी सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य आरटीओ कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष जगदीश कांदे, जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे महेश घुले, आरटीओ कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते. पुणे विभागातील एकूण दोनशे कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला. पुणे विभागातील पुण्यासह पिंपरी, बारामती, सोलापूर, अकलूज या कार्यालयांतील काम बंद राहिल्याने सर्व कामे ठप्प झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला.

Story img Loader