पुणे : पत्नी, सासू आणि मेहुणीने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस केल्याच्या आरोपावरुन पत्नी, सासू, मेहुणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम (वय ३२, रा. सत्यम राजयोग सोसायटी, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कदम यांचे वडील हरिश्चंद्र गोविंद कदम (वय ६०) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रफुल्ल याची पत्नी, सासू, मेहुणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल यांची सासू आणि मेहुणी चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर भागात राहायला आहेत.

Assistant Commissioner shreenivas dangat loses job due to third child
पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
UGC proposed regulation to expand vice chancellor selection criteria
कुलगुरू निवड निकषांतील बदलांचे स्वागत
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Woman molested central railway Express night Kalyan railway station
कल्याणला एक्सप्रेसमध्ये रात्री गर्दीचा गैरफायदा घेत महिलेचा विनयभंग
HMPV Found In Mumbai
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण

हेही वाचा…कुलगुरू निवड निकषांतील बदलांचे स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विवाहानंतर पत्नी, सासू, मेहुणीने प्रफुल्ल यांना त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही आम्हाला फसवले आहे. तू मेला तर मी दुसरा विवाह करुन सुखी राहिल’, असे त्यांनी प्रफुल्ल यांना सांगितले होते. पत्नी, सासू, मेहुणीच्या टोमण्यांमुळे त्यांनी ३१ डिसेंबर रोजी धानाेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रफुल्ल यांनी चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत पत्नी, सासू, मेहुणीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे प्रफुल्ल यांनी नमूद केले होते. त्यांचे वडील हरिश्चंद्र यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.

Story img Loader