पाच लाखांहून अधिक रक्कम रोकड स्वरूपात जमा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महापालिका नाटय़गृहांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या थकबाकीची रक्कम भरून आपली मान सोडवून घेत इच्छुक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरले. त्यामुळे गेल्या चार दिवसांत महापालिकेकडे तब्बल पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम रोकड स्वरूपात जमा झाली. ही थकबाकी भरणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय तगडय़ा उमेदवारांचा समावेश होता.
आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी राजकीय नेते आणि नगरसेवक नाटय़महोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. महापालिकेच्या विविध नाटय़गृहांमध्ये झालेल्या चौमाही वाटपामध्ये यापूर्वी दिलेल्या नाटय़संस्थांच्या तारखा या नगरसेवकांच्या कार्यक्रमांसाठी काढून घेतल्या जातात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर अनेकदा नाटय़गृहांचे भाडे देखील वेळेत भरले जात नाही. त्यामुळे राजकीय नेते आणि नगरसेवक यांची महापालिकेकडे थकबाकी राहते. गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवक आणि नेत्यांनी मिळून ५ लाख ३८ हजार ७०८ रुपये रोख स्वरूपात भरले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागूल हे पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक आहेत. निवडणुकीचा अर्ज भरण्याची वेळ येण्याआधी त्यांनी गणेश कला क्रीडा मंचची २ लाख २१ हजार रुपयांची थकबाकी भरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते किशोर शिंदे हे दरवर्षी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये नाटय़महोत्सवाचे आयोजन करतात.
त्यांनीही नाटय़गृहाच्या थकीत भाडय़ापोटी १ लाख ५६ हजार रुपयांचा भरणा केला. रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर हे सम्यक साहित्य संमेलनाचे संयोजक आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी नगरसेवकपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या भाडय़ापोटी थकलेले ९८ हजार ७०८ रुपये तातडीने भरून टाकले.
शिवसेनेचे नगरसेवक योगेश मोकाटे हे प्रबोधन विचार मंचच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यांनी ४६ हजार रुपयांची थकबाकी भरली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यातर्फे अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी १७ हजार रुपयांची रोकड भरून त्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविण्याचा मार्ग मोकळा केला.
‘ना हरकत प्रमाणपत्र’ अनिर्वाय
निवडणुकीचा अर्ज सादर करताना संबंधित उमेदवाराकडे तो महापालिकेचा थकबाकीदार नसल्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असावे लागते. ही अनिवार्यता असल्यामुळे आता महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याआधी ही थकबाकी भरून पुन्हा एकदा हे नगरसेवक जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या सर्वानी महापालिका नाटय़गृहांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या थकबाकीची रक्कम भरली.