पुणे : माझा विजय स्वर्गीय नेते गिरीश बापट यांना समर्पित करतो. त्यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा सभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराजयानंतर आमच्या हातून कसबा गेला असे, बोलले गेले परंतु या निवडणुकीत कसबा मतदारसंघातून मताधिक्य मिळवत कसब्यावर आमचे वर्चस्व सिद्ध केले आहे, अशी भावना पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> निकाल पहिल्यापासूनच ठरला होता! राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…
मोहोळ म्हणाले की, कॅन्टोन्मेंटमधून कमी मताधिक्य मिळाले, असे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. परंतु, महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र यांच्या पाठबळावर मी निवडून आलो. पुढील काळात रस्ते, विमानतळ आणि मेट्रो विस्तारीकरण, पीएमपीएल सक्षमीकरण आणि जाहीरनाम्यात दिलेले मुद्दे मार्गी लावणार. विशेषत दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
हेही वाचा >>> “स्वाभिमानी, सुजाण मतदारांचा काम आणि निष्ठेला कौल”, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीची भावना
मी भाजप केंद्रीय सरचिटणीस पदावर असून, महाराष्ट्रातील भाजप, महायुतीबाबत लागलेल्या अनाकलनीय निकालाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे बोलतील, असेही त्यांनी नमूद केले.