भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्तिकर भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या पॅनकार्डचा गैरवापर करुन आरोपी प्राप्तिकर भरणा केला. मुलाचे करपात्र उत्पन्न नसताना आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे भरणा करुन शासन तसेच प्राप्तिकर विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

हे देखील वाचा : टाटा मोटर्सच्या दोन हजार कामगारांचा जेवणावर बहिष्कार

याबाबत निवृत्त आयएएस अधिकारी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार महिला अधिकारी पौड रस्ता परिसरात राहायला आहे. त्यांचा मुलगा परदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यांचा मुलाला प्राप्तिकर भरणा करायचा होता. त्यामुळे महिला अधिकाऱ्याने प्राप्तिकर विभागात जाऊन माहिती घेतली. त्या वेळी मुलाने २०११ पासून नियमित प्राप्तिकर भरणा केल्याचे सांगण्यात आले. प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर महिला अधिकाऱ्याला धक्का बसला. चौकशीत त्यांच्या मुलाच्या पॅनकार्डचा गैरवापर करून बनावट प्राप्तिकर भरणा केल्याचे उघडकीस आले.

सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल –

दरम्यान, त्यांच्या मुलाच्या नावाने वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) भरणा करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर निवृत्त महिला अधिकाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस हाके तपास करत आहेत.

Story img Loader