वारजे भागात एका सोसायटीतील गणेश मंडळाच्या नावाने बनावट पावती पुस्तक तयार करुन उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट पावती पुस्तक तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन अशोक गावडे (वय २०, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत साई रघुनाथ शिंंदे (वय ३९, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : एक मैदान एक नेता ही अनेक वर्षाची परंपरा ; नीलम गोऱ्हे

गावडे आणि शिंदे एकाच सोसायटीमध्ये राहतात. गावडे सोसायटीचा सभासद नाही. त्याला गणेश मंडळासाठी वर्गणी गोळा करण्याचा अधिकार नसताना त्याने बनावट पावती पुस्तक तयार केले. सोसायटीच्या बाहेरील नागरिकांकडून त्याने वर्गणी गोळा केली तसेच सोसायटीची बदनामी करुन फसवणूक केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.