लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वाहन चालविण्याचा पक्का परवाना काढण्यासाठीच्या चाचणीत उत्तीर्ण होताना पुणेकरांच्या नाकी नऊ येत असल्याचे समोर आले आहे. परवान्याविना बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांचे शहर म्हणून कुप्रसिद्धी मिळविलेल्या पुण्यात पक्के परवाने काढायला गेलेले निम्मेच उमेदवार चाचणी उत्तीर्ण होऊ शकत असल्याचे निरीक्षण आहे.
कोणतेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहन परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संगमवाडी येथे शिकाऊ चाचणी विभाग स्थापन केला आहे. तो सहा महिने वैध असतो. त्यानंतर दुचाकीच्या पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी अर्जदाराला आळंदी रस्ता येथील आरटीओच्या कार्यालयात, तर चारचाकीच्या पक्क्या परवान्यासाठी भोसरीत ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ (आयडीटीआर) येथील चाचणी केंद्रात जावे लागते. शिकाऊ परवाना घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देऊन काढता येतो. मात्र, पक्क्या परवान्यासाठी ‘सीआयआरटी’ची संवेदक-आधारित कौशल्य चाचणी द्यावी लागते. यामध्ये इंग्रजी क्रमांक आठ, एच, तसेच तीव्र चढ आणि उतारावर वाहन नियंत्रित करण्यासाठी चालक पुरेसा कुशल आहे किंवा नाही, हे तपासले जाते. ही चाचणी संगणक प्रणालीवर आधारित असल्याने जरा जरी चूक झाली, तरी चालक अनुत्तीर्ण होतो.
आणखी वाचा-पिंपरीत आर्थिक वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या; रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह आरोपी…
‘आरटीओ’ने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२-२३ या वर्षात एक लाख ३९ हजार पक्के परवाने देण्यात आले होते. सन २०२३-२४ मध्ये त्यात घट झाली आणि एक लाख ३२ हजार पक्के परवाने देण्यात आले, तर एप्रिल २०२४ पासून २२ नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यांत अवघे ८५ हजार पक्के परवाने मंजूर झाले आहेत. खरे तर एप्रिल २०२४ पासून २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एक लाख ८३ हजार ५४७ जणांनी ऑनलाइन परीक्षा देऊन शिकाऊ परवाने प्राप्त केले. मात्र, परवाना पक्का करताना त्यातील केवळ ८५ हजार ५६० वाहनचालकच उत्तीर्ण झाल्याचे दिसते. अनुत्तीर्ण झालेल्यांना सहा महिन्यांच्या आत पुन्हा एकदा चाचणी देण्याची संधी दिली जाते. मात्र, अनेक वाहनचालक या पुनर्चाचणीसाठी अनुपस्थित राहिले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : वारजे भागात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणीचा मृत्यू
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत शिकाऊ आणि पक्के परवाने काढणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत घट झाली आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. परवाना काढणे हाही नियमच आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात झाला, तर संबंधित वाहनचालकावर कारवाई होते. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी