सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरात एका फर्निचर दुकानात मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. विठ्ठलवाडी परिसरात फर्निचर दुकान गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास फर्निचर दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा >>> अवकाळीने दाणादाण; रब्बी पिकांसह द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई पिकांचे नुकसान
नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. फर्निचर दुकान बंद असल्याने जवानांनी दरवाज्याचे कुलुप तोडले. फर्निचर पेटल्याने आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा करुन पाऊण तास आग आटोक्यात आणली.
First published on: 08-03-2023 at 10:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune fire breaks out at furniture shop on sinhagad road pune print news rbk 25 zws