पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आगीच्या घटनांमध्ये कोणी गंभीर जखमी झाले नाही.

दिवाळी शहर, तसेच उपनगरात आग लागण्याच्या घटना घडतात. यापार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून यंदा ‘सुरक्षित दिवाळी, आनंदी दिवाळी’ मोहिम राबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ध्वनीवर्धकावरुन शहराच्या वेगवेगळ्या भागात नागरिकांनी सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक आग लागण्याच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात ३६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. पाडव्याच्या दिवशी शहरात १४ ठिकाणी, तसेच भाऊबीजेच्या दिवशी फटाक्यामुळे ४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. दिवाळी सुरु झाल्यानंतर शहर, तसेच परिसरात एकूण मिळून ६० ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Fire decoration material godown, decoration material godown Sinhagad road area,
सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!

हेही वाचा – दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती

दिवाळीत आगीच्या घटना

वर्ष – आगीच्या घटना

२०२१ – २१
२०२२ – १९

२०२३ – ३५
२०२४ – ६०

Story img Loader