अग्निशमन दलातील दुचाकीस्वार जवानाच नायलाॅन मांज्यामुळे जखमी झाल्याची घटना मंगळवारी गुलटेकडीतील उड्डाणपुलावर घडली. या घटनेत जवानाच्या गळ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेेत. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या जवानाचे नाव आहे. मांढरे मंगळवारी दुपारी कोंढवा येथील अग्निशमन केंद्रात निघाले होते.
हेही वाचा >>> पुणे : पाणी बचतीसाठी पाणीबंद ठेवण्याची कल्पकता जी-२० च्या पाहुण्यांना दाखवावी; सजग नागरिक मंचाचा उपरोधिक टोला
गुलटकेडीतील उड्डाणपुलावर नायलाॅन मांजामुळे दुचाकीस्वार मांढरे यांचा गळ्याला दुखापत झाली. रक्तस्त्रााव झाल्याने मांढरे यांना चक्कर आली. त्यांनी उड्डाणपुलावर लटकणारा मांजा गोळा केला. मदतीला कोणी न आल्याने त्यांनी अग्निशमन दलातील सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
मांढरे यांना सहकाऱ्यांनी त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मांढरे यांच्या गळ्याला पंधरा टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.