पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ गुरुवारी मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून करण्यात आला. विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी शहर, तसेच उपनगरात शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त विसर्जन मार्गासह शहरातील विविध भागात तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : हिंजवडीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘डीजे’च्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यु? पोलीस म्हणतात

लक्ष्मी रस्त्यावरील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या विसर्जन मार्गावर पोलिसांनी नागरिकांसाठी पोलीस मदत केंद्र सुरु केले आहे. नागरिकांना माहिती देण्यासाठी इलेक्ट्राॅनिक फलक बसविण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ganesh visarjan 2023 started 8000 police force deployed 250 cctv installed pune print news rbk 25 css
Show comments