पेशवेकालीन सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यातील गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला रविवारी सुरुवात झाली. देवघरातील पंचधातूच्या वल्लभेष दशभूज गणरायाची वाड्याच्या दिवाणखान्यामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 

शनिवारवाड्यालगत असलेल्या कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्यात १७१४ पासून भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमीपर्यंत हा उत्सव साजरा कऱण्यात येतो. गायन, कीर्तन आणि धार्मिक प्रथापरंपरेनुसार सुरू असलेल्या या उत्सवाचे यंदा ३०८ वे वर्षे आहे. 

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
singles day in china
11/11: याच दिवशी का साजरा केला जातो ‘सिंगल्स डे’?
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी

हेही वाचा – उद्यापासून चांदणी चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी केली आहे ‘ही’ सुचना…

सनई चौघड्यांच्या मंगलस्वरात, ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत वेदोक्त पद्धतीने मयूरासनावर श्रीवल्लभेष गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी समीर कुलकर्णी यांचे गायन आणि सायंकाळी श्रेयस बडवे यांचे कीर्तन झाले. उत्सवात सोमवारी (२९ ऑगस्ट) श्रेयस बडवे, मंगळवारी (३० ऑगस्ट) वासुदेवबुवा बुरसे आणि बुधवारी (३१ ऑगस्ट) मोरेश्‍वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांचे कीर्तन आहे. तर ऋषिपंचमीला (१ सप्टेंबर) सायंकाळी चार वाजता वासुदेव बुरसेबुवा आणि सायंकाळी सहा वाजता मोरेश्‍वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल. उत्सव काळात दररोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे, अशी माहिती सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी दिली.