खडकी बाजारातील पीएमपी स्थानकात गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला समजावून सांगणाऱ्या पीएमपी चालक तसेच नियंत्रकाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने पीएमपी बसवर दगडफेक करुन दहशत माजविली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकास अटक केली.

वैभव पांडुरंग आगलावे, यश प्रवीण गोपनारायण (दोघे रा. महादेववाडी, खडकी), यश चांदणे, हर्षद चांदणे, प्रणव काळे, शुभम आगलावे, तरंग परदेशी, आनंद साळुंखे, मल्हार अवघडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी गोपनारायणला अटक करण्यात आली आहे. पीएमपी चालक रामलिंग हरिभाऊ बेडके (वय ४१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकी बाजारातील पीएमपी स्थानक परिसरात आरोपी थांबले होते. आरोपी मोठमोठ्या आवाजात बोलत होते तसेच एकमेकांना शिवीगाळ करत होते. पीएमपी स्थानकात गोंधळ घालणाऱ्या आरोपींनी पीएमपी चालक बेडके यांनी समजावून सांगितले.

pimpri chinchwad vote counting
पिंपरी : मतमोजणीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; किती पोलीस असणार तैनात?
pune vidhan sabha police force
पुण्यात मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त… किती पोलिसांची फौज तैनात?
pune district vote counting
पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील मतमोजणी कधी पूर्ण होणार ? प्रशासनाची तयारी काय ?
ggy 03 pune administration important information on pimpri chinchwad bhosari maval constituency result
पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळचा निकाल कधीपर्यंत येणार हाती? प्रशासनाने दिली महत्वाची माहिती
New admission certificate required for MPSC joint preliminary examination to be held on December 1
एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र आवश्यक… काय आहेत मार्गदर्शक सूचना?
Ashwini Kadam Madhuri Misal or Aba Bagul who will win from Parvati constituency
‘पर्वती’त कौल कुणाला? मिसाळ यांची विजयाची मालिका सुरु राहणार की…

तेव्हा आरोपींनी पीएमपी बसच्या काचेवर दगडफेक केली. बेडके यांना मारहाण केली. तेव्हा स्थानकातील नियंत्रक गायकवाड, लहू बळी यांनी टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी गायकवाड आणि बळी यांना मारहाण केली. मारहाणीत दोघांना दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच दहशत माजविल्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम तपास करत आहेत.