पादचाऱ्याच्या डोक्यात गज घालून त्याच्याकडील दोन लाखांची सोनसाखळी लुटून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी नीलायम चित्रपटगृह परिसरात पकडले.आशीष जितेंद्र दुबे (वय २१), दयानंद उर्फ गौतम देवेंद्र साळुंखे (वय २१, दोघे रा. दत्तवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार दत्तवाडीत राहायला आहेत. सकाळी ते मंदिरात पूजा करण्यासाठी निघाले होते. त्या वेळी आरोपी दुबे आणि साळुंखे यांनी त्यांच्या डोक्यात गज मारून गळ्यातील पाच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून नेली होती. दत्तवाडी पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. सराईत गुन्हेगार साळुंखे आणि साथीदार दुबे यांनी पादचाऱ्याला मारहाण करुन सोनसाखळी हिसकावून नेल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे यांना मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोघे जण नीलायम चित्रपटगृहाजवळ थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. साळुंखे सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे आदींनी ही कारवाई केली.