उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोला मागील आठवड्यात आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी येथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि ग्रामस्थांची बैठक झाली. मात्र ती बैठक निष्फळ ठरली असून ग्रामस्थांचा कचरा टाकण्यास विरोध कायम आहे. शहरातील विविध कचरा प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र काही प्रकल्प बंद अवस्थेत आहे. ते पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आल्याची माहिती टिळक यांनी दिली. लवकरच पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या सोबत बैठक घेतली जाईल आणि कचरा प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in