पुणे : परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी झाली आहे. लसणाच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात दहा किलो लसणाला प्रतवारीनुसार दोन हजार ते ३७०० रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाला प्रतवारीनुसार ३०० ते ४०० रुपये किलो दराने केली जात आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१० नोव्हेंबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ६ ते ७ टेम्पो गाजर, गुजरातमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा – पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो दहा ते अकरा हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमुग शेंग ४० ते ५० गोणी, कांदा ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात घट

कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कांदापात, पुदिना, अंंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर सव्वालाख जुडी, तसेच मेथीच्या ३५ हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिर आणि मेथीच्या जुडीमागे तीन ते चार रुपयांनी घट झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ८०० ते १८००, मेथी – १५०० ते २५००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- १००० ते १५००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ५०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ८००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४००-७००, पालक- ८००-१५००.

हेही वाचा – विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर

डाळिंब, मोसंबी, चिकू, पपईच्या दरात वाढ

डाळिंब, मोसंबी, चिकू, पपई, खरबूज, कलिंगडाच्या दरात वाढ झाली. अननस, पेरु, बोरे, सीताफळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ५० ते ६० टन, संत्री ६० ते ७० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू २५० गोणी, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ५ ट्रक, बाेरे ५०० गोणी, सीताफळ ४० टन अशी आवक झाली.