Heavy Rain Alert Pune : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात सर्वदूर सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव, मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. नागरिकांनी महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री पवार यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ही वाचा… डेक्कन जिमखाना येथील पुलाच्या वाडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

हे ही वाचा… पर्यटन नगरी लोणावळ्यात २४ तासात ३७० मिलिमीटर पाऊस; शाळांना दोन दिवसांची सुट्टी

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune guardian minister ajit pawar called residents to stay at home due to heavy rain unless important work pune print news psg 17 asj
Show comments