पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मेट्रोच्या फेऱ्या रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच आज विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने रस्ते बंद राहणार असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशीरापर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. पुण्यात विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे.
हेही वाचा : पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात
लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील प्रमुख रस्ते बंद आहेत. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीला येण्यासाठी आज सकाळी मेट्रो सेवेचा वापर केला. पाटील यांनी मेट्रोतून प्रवास करून ते विसर्जन मिरवणुक मार्गावर पोहोचले.