पुणे : चंदननगर भाजी मंडई परिसरातील हंबीरराव मोझे शाळेमध्ये गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास आग लागली. दहीहंडी सणाची शाळेला सुट्टी असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. चंदननगर भाजी मंडई परिसरात हंबीरराव मोझे शाळेतील सभागृहाला ही आग लागली होती. मात्र, दहीहंडीच्या सणानिमित्त सुट्टी असल्याने शाळेमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे दुर्घटना टळली. अग्निशमन दलाकडून येरवडा आणि मुख्यालयातून एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. दलाकडून आग आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये जखमी किंवा जिवितहानी झाली नाही.
हंबीरराव मोझे शाळेत आग; सुट्टी असल्याने दुर्घटना टळली
दहीहंडी सणाची शाळेला सुट्टी असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
First published on: 07-09-2023 at 18:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune hambirrao mozhe school in chandan nagar caught fire pune print news vvk 10 css