पुणे : पुण्यात गस्त घालणाऱ्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक पसार झाला आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. समाधान कोळी असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून संजोग शिंदे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॅरीश पुलाजवळ घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडलं आहे. पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी चालक फरार झाला आहे. ही घटना हॅरीश पुलाजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने भीषण धडक दिली. यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनचालक धडक देऊन पसार झाला आहे.

आणखी वाचा-राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची भरती?

मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू

रात्री दहा च्या सुमारास शरद वसंत गायकवाड आणि त्यांची पत्नी हे मुंबई- बंगळुरु हा महामार्ग ओलांडत असताना त्यांना ट्रकने भीषण धडक दिली. यात शरद वसंत गायकवाड यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune hit and run two on duty policeman hit by speeding car kjp 91 mrj
Show comments