पुणे : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये आवश्यक तांत्रिक कामांमुळे पुणे विभागातून सुटणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत रद्द करण्यात येणार आहे. पुणे- बिलासपूर (छत्तीसगड), पुणे- हटिया (झारखंड), पुणे-सांतरागाछी (कोलकाता) आदी गाड्यांवरही या कामाचा परिणाम होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे.मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागातील नागपूर मंडलात काचेवानी स्थानकावर आवश्यक तांत्रिक काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राजनांदगाव-कलमाना या स्थानकांदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे कामही केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : ज्वालाग्राही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

या कामामुळे पुणे ते हावडा दरम्यान धावणारी आझाद हिंद एक्स्प्रेस ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत धावणार नाही. १ सप्टेंबरला पुणे स्थानकावरून सुटणारी बिलासपूर – पुणे एक्स्प्रेस, २ आणि ४ सप्टेंबरला सुटणारी हटिया-पुणे एक्स्प्रेसही रद्द करण्यात येणार आहे. ३ सप्टेंबरला सांतरागाछीवरून पुण्याला येणारी एक्स्प्रेसही धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ५ सप्टेंबरची पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसही रद्द करण्यात येणार आहे. कोल्हापूरवरून सुटणारी कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत नागपूर स्थानकापर्यंतच धावणार आहे. गोंदियावरून सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपूर स्थानकापर्यंतच धावेल. ही गाडी गोंदिया-नागपूर दरम्यान रद्द राहील.