लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समिती बैठकीचा फटका जंगली महाराज रस्ता आणि परिसराला बसला. जंगली महाराज रस्त्याच्या दुतर्फा आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये मिळेल तिथे मोटारी, दुचाकी लावण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली.

या बैठकीसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावरूनही नाराजी व्यक्त होत असतानाच वाहतूक कोंडींचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागला.

आणखी वाचा- पिंपरी न्यायालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर

सकाळची वेळ असल्याने कामासाठी कार्यालयात पोहोचण्यासाठी निघालेले नोकरदार वाहतूक कोंडीत अडकून पडले. जंगली महाराज रस्त्या बरोबरच ओंकारेश्वर परिसरातही बेशिस्तपणे वाहने उभी करण्यात आली आहेत.