पुणे : शाळकरी मुलींचा पाठलाग करुन त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत एका मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष आहे.तक्रारदारांची १३ मुलगी णि तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी सव्वासातच्याा सुमारास शाळेत निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपीने मुलींना अडवले आणि त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.मुलींनी आरडाओरडा केल्यनंतर आरोपी पसार झाला. घाबरलेल्या मुलींनी याबाबतची माहिती पालकांना दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपनरीक्षक रतिकांत कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
हेही वाचा…परिवहन मंत्रालयाचे ‘वाहन’ बिघडले
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा
बालिकेशी अश्लील कृत्य करणाऱ्या एकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत बालिकेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण शेजारी आहे. त्याने बालिकेला चाॅकलेट देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या बालिकेने याबाबतची माहिती आईला दिली. त्यनंतर आरोपी तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.