पुणे : निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पुणे प्राप्तिकर विभागाने २४x७ कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी किंवा फोन कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोंदवून या कक्षाला माहिती देऊ शकतात. लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया देशभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास आठवड्याचे सातही दिवस कार्यरत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कक्षात नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरवापराशी संबंधित माहिती अथवा तक्रारी नोंदविता येतील. यामुळे आगामी निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाला मदत होणार आहे.

हेही वाचा…इंदापूर हत्या प्रकरण: मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!

तक्रार येथे नोंदवा…

टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-०३५३
टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-०३५४
व्हॉट्सॲप क्रमांक : ९४२०२४४९८४
ईमेल आयडी : pune.pdit.inv@incometax.gov.in
नियंत्रण कक्षाचा पत्ता : खोली क्रमांक ८२९, आठवा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune income tax department established 24x7 control room to stop misuse of money in election pune print news stj 05 psg
Show comments