पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाने शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. कय्यूम अहमद पठाण (वय ३३, रा. विद्यानगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका शाळेमध्ये नववीत आहे. आरोपी पठाण शाळकरी मुलांची मिनी बसमधून ने-आण करतो. बसमध्ये लहान मुले असतात. ती नववीत असल्याने बसमधील मागील आसनावर बसायची. ११ डिसेंबर रोजी मुलगी शाळेतून निघाली. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी बस थांबवली. मुलीने मुलाला खाली उतरवले. ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती. त्या वेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले.

हेही वाचा – पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

u

त्यानंतर घाबरलेली मुलगी बसमधील मागील आसनावर जाऊन बसली. मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली नाही. दोन दिवसांपूर्वी आरोपी पठाणने पुन्हा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अखेर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कोंढवा पोलिसांनी पठाणला अटक केली असून, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.

कर्वेनगर भागातील एका शाळेत नृत्यशिक्षकाने मुलांशी अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. तसेच, निष्काळजीपणाचा ठपका ठेवून वारजे माळवाडी पोलिसांनी संस्थाचालकालाही अटक केली होती.

शिक्षकेतर कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

हडपसर भागातील एका शाळेतील कर्मचाऱ्याने महिला पालकाला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयंभग केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची दोन मुले त्या शाळेत शिकतात. आरोपीने महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. मुलांना काही अडचण आल्यास तुम्हाला कळवत जाईन, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्याने महिलेला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केला. आरोपीने महिलेचा पाठलाग केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune indecent act with school girl by bus driver bus driver arrested by kondhwa police pune print news rbk 25 ssb