भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने शुक्रवारी दुपारी पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळ, दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी आपल्या परिवारासह आलेल्या केदारने गणपती बाप्पाची आरती करत, आपल्या आई-वडिलांच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली. यावेळी केदारला पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या यशाबद्दल केदारने यावेळी बाप्पाचे आभार मानले. “दगडूशेठ हलवाई पुण्यातलं प्रसिद्ध दैवत आहे, आतापर्यंत बाप्पाने मला काहीही न मागता अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे आज त्याचे फक्त आभार मानण्यासाठी मी आलोय”, केदार पत्रकारांशी बोलत होता.

Story img Loader