पुणे : कोथरूड भागात राहणाऱ्या एका उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून, १०० कोटी रुपयांची ऑर्डर असल्याची बतावणी पाटणा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते. ‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी आहेत. १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे’, अशी बतावणी आरोपींनी केली होती. बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी भेटू, असे आरोपींनी त्यांना सांगितले होते. ११ मार्च रोजी शिंदे विमानाने पाटणा येथे पोहोचले. त्या वेळी शिंदे यांनी कुटुंबीयांसाठी संपर्क साधला. पाटण्यातून झारखंडला कामानिमित्त चाललो आहे, असे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर शिंदे यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क झाला नव्हता. आरोपींनी त्यांची हत्या केल्यानंतर मोबाइलमधून ऑनलाइन पद्धतीने रक्कम काढून घेतली. त्यांच्या मोबाइलमधील सर्व माहिती आरोपींनी खोडून काढली. शिंदे यांचा मृतदेह सापडल्यानंतर पाटणा पोलिसांनी तपास करुन आरोपींनी अटक केली. शिंदे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कोथरूड पोलिसांनी बेपत्ता झालेल्या शिंदे यांचा शोध घेतला. पाटणा, गया परिसरात पोलिसांचे पथक गेले होते. सोमवारी (१४ एप्रिल) शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद परिसरात सापडला. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाटणा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

शिंदे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे पार्थिवर मंगळवारी सायंकाळी विमानाने आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.