मिळकत कर नावावर करुन देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या कर विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

संजय बबन काळे (वय ४५) असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. काळे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात नेमणुकीस आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पुणे : मीटरच्या प्रमाणीकरणाशिवाय रिक्षाची वाढीव भाडेआकारणी नाही

तक्रारदाराच्या इमारतीचा मिळकत कर नावावर करून देणे तसेच जुना मिळकत कर न आकारण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने तडजोडीत २० हजार रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधकाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत.

Story img Loader