भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) या वर्षी महाराष्ट्र संवर्गातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या २००३ च्या तुकडीचे हे अधिकारी आहेत.श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट), प्रकाश जाधव (पाेलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पाेलीस उपायुक्त झोन ५ ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि रश्मी करंदीकर (एसपी नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा मिळालाआहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना प्रसृत केली आहे.
हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार भारतीय पोलीस सेवेचा दर्जा प्रदान केला जातो. सचोटी आणि चांगले काम आणि कार्यकाळात एकही प्रतिकूल नोंद नसलेल्या अधिकाऱ्यांना हा दर्जा मिळतो. या अधिकाऱ्यांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.