पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दहा आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी बुधवारी न्यायालयात अर्ज केला असून, विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी पोलिसांना चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.

अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाच्या रक्ताच्या नमुने बदल प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, पत्नी शिवानी (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार करणारे अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, मोटारीतील सहप्रवासी मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करणारे आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर) आणि अरुणकुमार सिंग यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी आशिष मित्तलला रक्ताचे नमुने देण्यास सांगणारा अरुणकुमार देवनाथ सिंग याच्याविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात एकत्रित खटला चालविला जाणार आहे.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड

हेही वाचा : पिंपरी : ‘ब्रॅण्ड’च्या नावाखाली बनावट कपडे विक्री; कुठे घडला हा प्रकार?

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना किती रक्कम दिली जाणार होती, तसेच आरोपींनी त्यांना काही आमिष दाखविले होते का? यादृष्टीने तपास करायचा आहे. सर्व आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी करायची आहे, असा अर्ज न्यायालायत दाखल करण्यात आला.

हेही वाचा : पुणे : पवना धरणात दोन तरुण बुडाले

डाॅ. तावरेचा न्यायालायत अर्ज

ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे याने याप्रकरणातून वगळण्यात यावे, याबाबत न्यायालायत अर्ज दाखल केला आहे. आशिथ मित्तलने खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी बुधवारी न्यायालायात अर्ज केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी दिली.

Story img Loader