पुणे : युरोपातील प्रिश्टिना कोसेवा येथे झालेल्या ‘लाइफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये पुण्याच्या किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या ‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाने द बेस्ट शॉर्ट फिल्म विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्रिश्टिना कोसोवा येथे प्रजासत्ताकदिनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तसेच प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे आनंदी असल्याची भावना किशोर लोंढे याने व्यक्त केली.

या महोत्सवात ९२ देशातून ९०० लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील ७२० लघुपटांमधून उत्कृष्ट सहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाने प्रथम क्रमाक पटकावला. एक मिनिटाच्या लघुपटामध्ये पत्रकारितेची सध्याच्या काळातील? अवस्था तसेच राजकारणी आणि गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर  हिरावून घेतलेलं पत्रकारितेचं स्वातंत्र्य हा  विषय मांडण्यात आला आहे.

article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
International Sanskrit Film Festival
आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सव गोव्यात
Ulhasnagar, Kumar Ailani, kalani family, BJP MLA Kumar Ailani, Kumar Ailani news, Ulhasnagar latest news,
उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र
Pomegranate and onion traders cheated by foreigners
डाळिंब, कांदा व्यापाऱ्यांची परप्रांतीयांकडून फसवणूक
Barti, Mahajyoti, Police Pre- Recruitment Training,
पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण; आचारसंहिता लागल्यामुळे…

आतापर्यंत युरोप, अमेरिका, इटली, रशिया, आफ्रिका या ठिकाणच्या अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखण्यात आला आहे.

‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी?

केले असून निर्मिती अविनाश लोंढे यांची आहे. किशोर हा मूळचा वेणेगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आहे. एमबीए असलेल्या किशोर लोंढे  याने चित्रपटनिर्मितीची आवड जोपासत दिग्दर्शनात यश मिळविले आहे. यापूर्वी  किशोरने ‘आझाद’, ‘जन्मजात’ अशा यशस्वी लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.