पुणे : युरोपातील प्रिश्टिना कोसेवा येथे झालेल्या ‘लाइफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये पुण्याच्या किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या ‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाने द बेस्ट शॉर्ट फिल्म विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्रिश्टिना कोसोवा येथे प्रजासत्ताकदिनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तसेच प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे आनंदी असल्याची भावना किशोर लोंढे याने व्यक्त केली.
या महोत्सवात ९२ देशातून ९०० लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील ७२० लघुपटांमधून उत्कृष्ट सहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाने प्रथम क्रमाक पटकावला. एक मिनिटाच्या लघुपटामध्ये पत्रकारितेची सध्याच्या काळातील? अवस्था तसेच राजकारणी आणि गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेलं पत्रकारितेचं स्वातंत्र्य हा विषय मांडण्यात आला आहे.
आतापर्यंत युरोप, अमेरिका, इटली, रशिया, आफ्रिका या ठिकाणच्या अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखण्यात आला आहे.
‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी?
केले असून निर्मिती अविनाश लोंढे यांची आहे. किशोर हा मूळचा वेणेगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आहे. एमबीए असलेल्या किशोर लोंढे याने चित्रपटनिर्मितीची आवड जोपासत दिग्दर्शनात यश मिळविले आहे. यापूर्वी किशोरने ‘आझाद’, ‘जन्मजात’ अशा यशस्वी लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.