पुणे : मुलगाच हवा म्हणून मारहाण, अश्लील चित्रफीत दाखवून पत्नीचा छळ तसेच अश्लील कृत्य करणाऱ्या एकास कोंढवा पोलिसांनी अटक केली. याबाबत एका पीडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >> “लोक स्वत:शीच लग्न करु लागली तर हिंदूंची लोकसंख्या कमी होईल”; भाजपा आमदाराचा ‘सोलोगॅमी’ला विरोध

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेला सध्या चार मुली आहेत. आता मुलगाच हवा म्हणून या महिलेचा पती मागील अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होता. विशेष म्हणजे आरोपी पीडित महिलेला मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिचा छळ आणि अश्लील कृत्य करत होता. पीडित महिलेला आरोपीने अनेकवेळा मारले. याच सततच्या छळामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांना दुसऱ्यांदा करोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती!

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र मुलगाच हवा या हट्टापायी अश्लील चित्रफीत दाखवून महिलेला त्रास देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Story img Loader