शिरुर : ‘तु आमच्या मित्रास खून्नस देवून का पाहीले ‘ या कारणावरुन १७ वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या सात आरोपीना पोलीसांनी अटक केली असून त्यांना २९ मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे . या प्रकरणी १) शंकर जालिंदर करंजकर वय १९ वर्षे, मुळ रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव (२) ओम दत्ता चव्हाण वय १८ वर्षे, २ महिने, मुळ रा. धानोरा, ता. करंजा, जि. वाशिम, (३ ) रोहन रघुनाथ बोटे वय १८ वर्षे, ०४ महिने, मुळ रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर. (४ ) ओंकार विजय देशमुख वय १८ वर्षे, १०महिने, मुळ रा. डोनवाडा, ता. वसमत जि. हिंगोली. (५ ) गिरीश गोविंद क-हाळे वय २० वर्षे, मुळ रा. हिवरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली. (६) गोरख विठ्ठल मोरे वय २२ वर्षे, मुळ रा. कृष्णानगर, मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड (७ ) हर्षल सुरेश पारवे वय २० वर्षे, मुळ रा. शिवानी, ता. शेणगाव, जि. हिंगोली. सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. यांना २ अटक करण्यात आली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यश राजु धनवटे सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. रामपुर, ता. श्रीरामपुर,जि.अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे .
२३ मार्च रोजी कारेगाव येथील प्लेटोर सोसायटीचे समोर २३ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास सौरभ श्रीराम राठोड वय -१७ सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. शिवाजीनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी याला गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे व इतर दोन अनोळखी जणांनी सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे यांनी ‘ तु आमचा मित्र ओंकार देशमुख यास खुन्नस देवुन का बघितले . तुला माहित आहे का, ओंकार देशमुख कोण आहे, थांब तुला जिवंतच सोडत नाही असे म्हणुन ओंकार देशमुख व रोहन बोटे याने त्यांचेकडील कोयत्याने सौरभ राठोड याचे पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले . तसेच इतर साथीदार आरोपींनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन सौरभ श्रीराम राठोड यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता .
आरोपीचा शोध पोलीस स्टेशन कडील तपास पथक, स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक करत असताना तांत्रिक माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी हे केज, जि. बीड हद्दीत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज पोलीस स्टेशनमधील पोलीसांची मदत घेवुन आरोपीना ताब्यात घेतले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण व तपास पथकाने केज पोलीस स्टेशन, जि.बीड येथुन आरोपींना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केले आहे.या सर्वाना न्यायालयाने दि. २९ मार्च रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन विधिसंघर्षीत बालकाचा देखील समावेश असून त्यास पुणे, औंध येथुन ताब्यात घेवुन जिल्हा बाल न्यायालय, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करीत आहेत.