पुणे महापालिका निवडणुकीला अद्याप मुहूर्त लागलेला नसला, तरी पुण्यात एकाच सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या दोन नेत्यांमध्ये होर्डिंग वॉर सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यानं पुण्यात होर्डिंग वॉर रंगलं आहे.

अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Pankaja Munde And Devedra Fadnavis Meeting At Mumbai.
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी; देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन, “खास…”
CM Devendra Fadnavis Answer to Sharad Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून…”
अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही विरोधकांना…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”

पुणे शहरात मागील तीन चार दिवसांपासून भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरभर विकासपुरुष या मथळ्याखाली फ्लेक्स लावले जात आहेत. या फ्लेक्सबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला सुनावलं. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंडही फुटलं. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून २२ जुलै रोजी अजित पवार यांचा देखील वाढदिवस असल्याने भाजपाच्या फ्लेक्सबाजीला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर देण्यात आले आहे.

दोन्ही पक्षांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग लावल्या आहेत. या होर्डिंगची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. होर्डिंगवरून भाजपा-राष्ट्रवादी आमने-सामने आल्यानं हा महापालिका निवडणुकीपूर्वीचा ट्रेलर तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीतदेखील असाच राजकीय धुरळा उडण्याची चिन्ह यानिमित्ताने दिसत आहे.

Story img Loader